ऑस्करनं दिली रेहमानला हुलकावणी

February 28, 2011 12:10 PM0 commentsViews: 6

28 फेब्रुवारी

पाच वेळा ऑस्कर नॉमिनेशन आणि दोनदा ऑस्कर मिळवलेल्या ए.आर.रेहमानला यावर्षी मात्र ऑस्करनं हुलकावणी दिली. स्लमडॉग मिलेनिअरसाठीचं ऑस्कर भारतात आणल्यावर रेहमान पुन्हा एकदा ऑस्करच्या शर्यतीत उतरला होता. डॅनी बोएलच्या 127 अवर्सच्या बेस्ट ओरिजनल स्कोअरसाठी आणि 'इफ आय राइस' या गाण्याच्या संगीतासाठी रेहमानला नॉमिनेशन मिळालं होतं. पण यावर्षीच्या बेस्ट ओरिजनल स्कोअरचं ऑस्कर 'द सोशल नेटवर्क''साठी ट्रेंट रेझनोर आणि ऍटिकस रॉस यांना मिळाले आहे. त्यामुळे रेहमानचं ऑस्कर हुकलंय. असं असेल तरी गायिका डायडोबरोबर ऑस्कर सोहळ्यात त्याचा परफॉर्मन्स असणार आहे. तो डायडोसोबत लवकरच एक व्हिडिओही रिलीज करणार आहे.

close