बीडमध्ये गारपीटीमुळे पीकांचे मोठ नुकसान

February 28, 2011 1:56 PM0 commentsViews: 7

28 फेब्रुवारी

बीड जिल्ह्यात काल रात्री आणि आज पहाटे झालेल्या गारपीटीमुळे जवळ जवळ 500 एकर शेतीचं नुकसान झालं आहे. शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेलं पीक एका रात्रीत उद्‌ध्वस्त झालं आहे. यात गहू, आंबा, द्राक्ष, मोसंबी, कांदा या पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहेत. गारपीट एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती की त्यामुळे कोंबड्या, चिमणी, कावळे गारठून मरण पावले. गेल्या 60 वर्षांत अशा प्रकारची गारपीट पहिल्यांदाच झाल्याचं पीडित शेतकर्‍यांचं म्हणणं आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाईबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहे.

close