पुण्यात इमारतीच्या आगीत 35 गाड्या जळून खाक

February 28, 2011 2:03 PM0 commentsViews: 6

28 फेब्रुवारी

पुण्यातल्या कोंढवा भागात लागलेल्या आगीत गाड्या मोठ्या प्रमाणात जळाल्या आहेत. कोंढवा परिसरातल्या ग्लोबल हाईट्स या इमारतीच्या पार्किंग मध्ये काल रात्री 2 च्या सुमारास आग लागली. यामध्ये तब्बल 30 दुचाकी, 6 रिक्षा आणि 1 चारचाकी जळाल्या आहेत. ही आग लागली नसून लावली गेली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मात्र एमएसईबीच्या चुकीमुळे ही आग लागली असल्याचा आरोप इथल्या रहिवाश्यांनी केला आहे. मात्र एमएसईबीच्या अधिकार्‍यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. याठिकाणच्या वीज पुरवठा आधीच कट झाला होता. त्यामुळे आग लागण्याचे काही कारणच नसल्याचे एमएसईबीच्या अधिकार्‍याचं म्हणणं आहे. त्यामुळे आग लागण्याचं नेमक कारण काय याचा आता पोलीस करत आहेत.

close