अजित पारसनीस यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती

February 28, 2011 2:09 PM0 commentsViews: 13

28 फेब्रुवारी

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी अजित पारसनीस यांची नियुक्ती करण्यात आली. तर मुंबईच्या आयुक्तपदी अरुप पटनायक यांची नियुक्ती करण्यातआली. तर मुंबईचे पोलीस आयुक्त संजीव दयाळ यांना पदोन्नती देत त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. दरम्यान, राज्याचे नवे पोलिस महासंचालक अजित पारसनीस आणि मुंबईचे आयुक्त अरूप पटनायक यांनी आज आपल्या पदाचा कार्यभारही स्विकारला. पोलीस दलाला शिस्त लावू असं आश्वासन यावेळी अरूप पटनायक यांनी दिलं.

close