झिंबाब्वेनं नोंदवला पहिला विजय

February 28, 2011 2:49 PM0 commentsViews: 3

28 फेब्रुवारी

वर्ल्ड कपच्या ग्रुप ए च्या आजच्या पहिल्या मॅचमध्ये झिंबाब्वेने कॅनडाचा 175 रननी धुव्वा उडवला. नागपूरच्या जामठा स्टेडियमवर गर्दी केलेल्या मोजक्या लोकांना ततेंदू तैबूची जोरदार बॅटिंग बघायला मिळाली. फक्त दोन रननी त्याची सेंच्युरी हुकली. पण 99 बॉलच्या नेटक्या इनिंगमुळे त्याने टीमला तीनशे रनच्या जवळ नेलं. क्रेग आयर्विनने 81 बॉलमध्ये 85 रन करत त्याला चांगली साथ दिली. झिंबाब्वेने पन्नास ओव्हरमध्ये नऊ विकेटवर 298 रन केले. कॅनडाची टीम या स्कोअरला उत्तरच देऊ शकली नाही. त्यांची सुरुवातच सात रनवर तीन विकेट अशी भयानक होती. अखेर त्यांची अख्खी टीम 123 रनमध्ये आऊट झाली. झिंबाब्वेसाठी क्रेमर आणि रायन प्राईसने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. या वर्ल्ड कपमधला झिंबाब्वेचा हा पहिला विजय ठरला.