क्रीडा क्षेत्राला 1121 कोटी रुपयांची तरतूद

February 28, 2011 5:37 PM0 commentsViews: 4

28 फेब्रुवारी

यंदाच्या बजेटमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी 1121 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यांपैकी एक हजार कोटी रुपये हे वर्षभरातील क्रीडा खात्याच्या विविध खर्चांसाठी वापरण्यात येणार आहे. तर 121 कोटी रुपये हे वर्षभरासाठी राखीव ठेवण्यात आलेत. याआधीच्या बजेटपेक्षा ही रक्क एक तृतींयाशाने कमी आहे. दिल्लीतील कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेच्या खर्च गृहीत धरून गेल्यावर्षी 3315 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती.

close