वेस्ट इंडिजची विजयी सलामी

February 28, 2011 6:00 PM0 commentsViews: 2

28 फेब्रुवारी

2011 च्या वर्ल्ड कपमध्ये आज पहिल्या हॅट्‌ट्रीकची नोंद झाली. वेस्ट इंडिज आणि नेदरलँडदरम्यान आज रंगलेल्या मॅचमध्ये विंडिजचा केमार रोचनं हॅट्‌ट्रीक घेतली. विंडिजनं विजयासाठी नेदरलँडसमोर 330 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण नेदरलँडची टीम अवघ्या 115 रन्सवर ऑलआऊट झाली. मॅचच्या 31 व्या ओव्हरला रोचनं सलग तीन विकेट घेत विंडिजच्या विजयावरही शिक्कामोर्तब केला. या मॅचमध्ये रोचनं अवघ्या 27 रन्समध्ये 6 विकेट घेतल्या. विंडिजनं नेदरलँडचा तब्बल 215 रन्सनं पराभव करत स्पर्धेतल्या पहिल्या विजयाची नोंद केली.

close