जैतापूरमध्ये पोलिसांकडून आंदोलकांना अटक

March 1, 2011 9:12 AM0 commentsViews: 2

01 मार्चमुख्यमंत्र्यांच्या जैतापूर दौर्‍यात प्रकल्पग्रस्तांचा झालेला प्रखर विरोध दडपण्यासाठी पुन्हा एकदा पोलिसांकडून आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. रविवारी रात्री मिठगवाणे गावातील 11 आंदोलक तसेच साखरी नाटे गावातील मच्छिमार नौकांवर काम करणार्‍या 18 नेपाळी खलाश्यांना अटक करण्यात आली आहेत. काल रात्री पुन्हा मिठगवाणे गावातल्या प्रकल्पग्रस्तांचे नेते डॉक्टर मिलिंद देसाई यांनाही अटक करण्यात आली. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आणखीनच संतापले आहेत. डॉ. देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यावेळी प्रकल्पविरोधी भाषण करताना नारायण राणे रोखल होतं त्यामुळे देसाई यांना आपलं भाषण अर्धवट थांबवावे लागले होते. शनिवारच्या मेळाव्यात डॉ. मिलिंद देसाई यांच्यावर उद्योगमंत्री नारायण राणे कशा पद्धतीनं दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते.

दरम्यान, जैतापुरचा प्रश्न केवळ दंडुकेशाही किंवा पोलिसांच्या बळावर सुटणार नाही. त्यासाठी लोकांना लोकांच्या भाषेत समजावून सांगितलं पाहिजे असा टोला नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी नारायण राणेंना लगावला. मला लोकांना समजावण्याची जबाबदारी दिली तर लोक नक्कीच शांत होतील असं सांगायलाही ते विसरले नाहीत. पंढरपुरात ते पत्रकारांशी बोलत होते.

close