गोध्रा जळीतकांड प्रकरणी 11 जणांना फाशी

March 1, 2011 9:28 AM0 commentsViews: 1

01 मार्चगोध्रा जळीतकांड प्रकरणी 11 जणांना फाशी आणि 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहेत. साबरमती विशेष कोर्टानं हा निर्णय दिला. 27 फेब्रुवारी 2002 ला हे जळीतकाडं घडलं होतं. त्यात 59 कारसेवकांना जिवंत जाळण्यात आलं होतं. याप्रकरणात कोर्टानं गेल्या आठवड्यात 31 जणांना दोषी घोषित केलं होतं. तर 63 जणांची निर्दोष सुटका केली होती. आज मंगळवारी या प्रकरणी निकाल देताना साबरमती कोर्टानं 11 जणांना फाशी सुनावली तर 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. रेअरेस्ट ऑफ रेअर केस असा शेरा मारत कोर्टानं 900 पानी निकालपत्र सादर केला. दरम्यान, आम्ही या निर्णयाला 90 दिवसांच्या आत आव्हान देणार असल्याचं सरकारी वकील जे. एम. पांचाल यांनी सांगितले आहे.

प्रकरणातील आरोपींना कोणती शिक्षा देण्यात आली

- रझाक कुरकुरला फाशी- सलीम जर्दाला फाशी – मेहबूब हसन लालूला फाशी – हाजी बिलालला फाशी – इरफान पातडियाला फाशी – रमजानी बैहराला फाशी – कलंदर जाबीरला फाशी – सिराज बालाला फाशी – इरफान भोपू कलंदरला फाशी – अब्दुल रेहमानला फाशी – रमजानी बिनयामिनला फाशी

close