रॉकेल भेसळ प्रकराणातील आरोपी नगरसेवक पुन्हा फरार

March 1, 2011 9:44 AM0 commentsViews: 9

01 मार्च

रॉकेल भेसळ प्रकराणातील फरारी आरोपी काँग्रेसचा नगरसेवक एजाज बेग विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत मतदान करुन पोलिसांच्या समोरुन पुन्हा फरार झाला. दहा दिवसांपूर्वी मालेगाव इथं ट्रकमध्ये इंधन भरताना पोलिसांनी छापा टाकला होता. त्यादरम्यानच एजाज बेग हा फरार झाला होता.आझाद नगर पोलिसांनी त्याला फरार आरोपी म्हणून घोषित केलं होतं आणि त्याचा शोध पोलीस घेत होते. पण काल विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत मतदानासाठी पोलिसांच्या समक्ष तहसील कार्यालयात येऊन त्यानं मतदान केलं. आणि तिथून त्यानंतर फरारही झाला.मतदान केंद्रावर त्यांने मतदान करुन तो पून्हा फरार झाला आहे. पोलिसांनी अटकेचं नाटक करुन पाहिलं परंतू बेगने राजकीय वजन वापरुन पून्हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे.

close