जैन समाजाचे अभ्यासक डॉ.विलास संगवे यांचं निधन

March 1, 2011 9:57 AM0 commentsViews: 4

01 मार्च

जैन समाजाचे गाढे अभ्यासक डॉ.विलास संगवे यांचं आज पहाटे कोल्हापुरात वृद्धपकाळानं निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. जैन कम्युनिटी ए सोशल सर्व या विषयावर त्यांना मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळाली होती. शिवाजी विद्यापीठ समाजशास्त्र अभ्यासक्रमातील मराठीतले पहिलं पुस्तक त्यानी लिहिलं होतं. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठातील शाहु संशोधन केंद्राचे मानद संचालक होते. त्यानी जैनालॉजी विषयावरील 15 ग्रंथाचं लिखाण केलं आहेत. त्यांना आचार्य कुंद पुरस्कार,अहिंसा पुरस्कार,गोमटेश पुरस्कार, शिवाजी विद्यापीठचा डी लीटनं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

close