जेपीसीची आज औपचारिक घोषणा

March 1, 2011 11:23 AM0 commentsViews: 1

01 मार्च

टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसी म्हणजे संसदीय संयुक्त समितीची आज औपचारिक घोषणा होणार आहे. पंतप्रधानांनी घोषणा केल्यानंतर राज्यसभेत हे बिल मांडलं जाईल. त्यानंतरच यातल्या पॅनलमधल्या सदस्यांची यादी जाहीर होईल. मात्र त्यातही आता राजकारण प्रवेश करू पाहत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या जसवंत सिंग, यशवंत सिन्हा आणि गोपीनाथ मुंडे यांना काँग्रेसचा विरोध आहे. 2003 ची टेलिकॉम पॉलिसी ठरवताना जसवंत आणि यशवंत सिन्हांचा त्यात समावेश होता. त्याचबरोबर त्यावेळचे दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन यांचे गोपीनाथ मुंडे हे मेहुणे आहेत. त्यामुळे तपासाची पाळमुळं जर एनडीए सरकारपर्यंत जात असतील तर त्यात या नेत्यांचा अडथळा होऊ शकतो असा संशय व्यक्त होतो. अर्थातच डाव्यांचाही त्यांच्या समावेशाला विरोध असल्याचं सांगितले जात आहे.

close