नाशिक महापालिकेत मनसे नगरसेवकांचा गोंधळ

March 1, 2011 10:50 AM0 commentsViews: 6

01 मार्च

नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समितीच्या निवडीवरून मनसेच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. मनसेतून शिवसेनेत गेलेले नगरसेवक प्रताप मेहेरोलिया यांचं नाव मनसेच्या कोट्यातून जाहीर झाल्याने मनसेच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. यावेळी महापौरांच्या पुढ्यातील राजदंडही पळवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, महापौरांनी जबरदस्तीनं राष्ट्रगीत सुरू करून सभा आटोपती घेतली. मात्र विभागीय आयुक्तांनी मनसेचा अर्ज फेटाळून लावल्याने स्थायी वरची आपली नियुक्ती कायदेशीर असल्याचा दावा मेहरोलिया यांनी केला. तर या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं मनसेचं म्हणणं आहे.

close