दहावीच्या परीक्षेला सुरूवात

March 1, 2011 8:07 AM0 commentsViews: 7

01 मार्च

आजमंगळवारपासून 10 वी च्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. या परीक्षेकरता एकूण 16 लाख 41 हजार 396 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 9 लाख 5 हजार 774 विद्यार्थी तर 7 लाख 35 हजार 622 विद्यार्थीनी आहेत. एकूण 19 हजार 884 शाळांमधे या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून या परीक्षेकरता राज्यात 3 हजार 718 परीक्षा केंद्र आहेत. परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्याकरता प्रत्येक जिल्ह्यासाठी 7 याप्रमाणं 245 भरारी पथक नेमण्यात आली आहेत.

close