जैतापूर प्रकल्पविरोधकांची मुस्कटदाबी सहन करणार नाही – उध्दव ठाकरे

March 1, 2011 12:29 PM0 commentsViews: 6

01 मार्च

जैतापूर प्रकल्पावरुन पुन्हा एकदा नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जुंपली आहे. जैतापूर प्रकल्पविरोधकांची मुस्कटदाबी केली तर सहन करणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. तसेच आपण 9 तारखेला जैतापूरला जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जैतापूर दौर्‍यावर असताना प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधण्यासाठी मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात आमदार राजन साळवी आणि नारायण राणे यांच्यात वाद झाला होता.

close