वर्ल्ड कप ऑनलाईन तिकीट विक्रीला सुरूवात

March 1, 2011 1:43 PM0 commentsViews:

01 मार्च

वर्ल्ड कप फायनलसाठी खुली तिकीट विक्री 11 मार्चपासून सुरु होत आहे. तर आजपासून ऑनलाईन तिकीट विक्री सुरु झाली. पण www.icccwc2011.kyazoonga.com या ऑफिशियल साईटवर उपलब्ध असलेल्या तिकीटांची कमीतकमी किंमत आहे. साडे 12 हजार रुपये नाहीतर, साडे 18 हजार रुपये. आयसीसीने ऑनलाईन तिकीट विक्रीसाठी बॅलट पद्धत सुरु केली. त्यामुळे एवढे पैसे खर्चून तिकीट घ्यायची तुमची तयारी असेल तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. आणि तिकीटांची तुमची मागणी नोंदवावी लागेल. त्याची मुदत आहे पुढचे 7 दिवस. ही मुदत संपल्यावर लॉटरी काढण्यात येईल. आणि या लॉटरीत ज्यांची नावं येतील त्यांना पैसे भरुन तिकीट घरपोच मिळतील.स्पर्धेच्या सेमी फायनल मोहाली आणि कोलंबोत होणार आहेत. तर फायनल मॅच अर्थातच मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

close