पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर

March 1, 2011 4:29 PM0 commentsViews: 8

blank_page01 मार्च

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पाँडिचेरी आणि आसाम या राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमधली दोन राज्य महत्त्वाची आहेत. कारण या राज्यांमध्ये डाव्यांची सत्ता आहे ती म्हणजे पश्चिम बंगाल आणि केरळ. तर तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णाद्रमुक पक्षात जोरदार लढत होणार हे स्पष्ट आहे.

2 जी स्पेक्ट्रमच्या मुद्यावर तिथे जयललिता द्रमुकला प्रचारादरम्यान कोंडीत पकडणार हे जरी नक्की असलं तरी द्रमुक बरोबर सत्तेत असलेल्या काँग्रेसवर ही भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष याचा तामिळनाडूमधल्या निवडणुकांमध्ये कसा सामना करतात हे पाहावं लागेल. तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात म्हणजे 13 एप्रिलला निवडणूक होणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये सहा टप्प्यात निवडणुका होणार आहेत.

याठिकाणी डाव्यांच्या सत्तेला ममता बॅनर्जी सुरुंग लावणार का हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. गेल्या काही वर्षात बंगाल नेहमीच वेगवेगळ्या संघर्षाच्या मुद्यांवरून चर्चेत आला. केरळमध्येही डाव्यांच्या सत्तेचा बालेकिल्ला ढासळेल असं शक्यता वर्तवली जात आहे. तर आसाममध्ये दोन टप्प्यात मतदान घेतलं जाणार आहे. तिथं आसाम गण परिषद पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करेल असं बोलंल जात आहे. तर पुदुचेरीमध्ये एका टप्प्यात मतदान पार पडणार आहे. या सगळ्या राज्यात झालेल्या मतदानाचा निकाल 13 मे रोजी लागणार आहे.

मतदान कधी होणार

1. केरळ – 13 एप्रिलला मतदान, तामिळनाडू- एकाच टप्प्यात – 13 एप्रिलला मतदान

2.पश्चिम बंगाल – 6 टप्प्यात निवडणूक3.पहिला टप्पा – 18 एप्रिल, दुसरा टप्पा – 23 एप्रिल, तिसरा टप्पा – 27 एप्रिल4. चौथा टप्पा – 3 मे, पाचवा टप्पा – 7 मे, सहावा टप्पा – 10

तामिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यात चुरशीच्या लढती पाह्यला मिळणार आहेत. या राज्यांमध्ये कोणत्या प्रमुख पक्षांमध्ये लढती होतील.

तामिळनाडू एकूण जागा – 234

द्रमुक आघाडी (करुणानिधी फोटो)विरूद्धअण्णा द्रमुक आघाडी (जयललिता)

पश्चिम बंगालएकूण जागा – 294तृणमूल काँग्रेस +आघाडी (ममता)विरुद्धडावी आघाडी (बुद्धदेव भट्टाचार्य)

केरळएकूण जागा – 140युडीएफ विरुद्धएलडीएफ

close