मनसेचं रेल्वे कार्यालयावर आंदोलन

March 1, 2011 5:12 PM0 commentsViews: 4

01 मार्च

रेल्वेच्या भरती प्रक्रिये विरोधात मनसेने मध्य रेल्वेच्या कार्यालयावर आंदोलन केलं. मध्य रेल्वेच्या गँगमन, सफाईवाला, पॉंईटस्‌मन तसेच खलाशी या पदांसाठी 3500 कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया पार पडली. या भरतीत प्रक्रियेतल्या फिटनेसच्या अटी फारच जाचक असून त्या अटी पूर्ण करणं राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या खेळाडूला देखील शक्य नाही. त्यामुळे स्थानिक भूमीपुत्रांना त्या अटी पूर्ण करणं शक्य न झाल्यानं नोकरी मिळविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या फिटनेसच्या अटी शिथील करून भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणावी अशा आशयाचं निवेदन मनसे तर्फे आमदार बाळा नांदगावकर यांनी मध्य रेल्वेच्या जनरल मॅनेजर कुलभूषण यांच्याकडे सूपूर्द केलं.

close