पुणे बंद प्रकरणी पोलिसांचा अर्ज कोर्टाने फेटाळला

March 1, 2011 3:36 PM0 commentsViews: 3

01 मार्च

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्‍हे आणि उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना जामीन मिळू नये म्हणून पोलिसांनी केलेला अर्ज कोर्टाने आज फेटाळून लावला आहे. शिवसेनेने पुकारलेल्या पुणे बंद प्रकरणी या दोघांचेही फोन टॅपिंग करण्यात आले होते. त्यामध्ये पुण्यात हिंसक आंदोलन करण्याचं या दोघांचं संभाषण पोलिसांनी टॅपिंग केलं होतं. त्यानंतर या दोघांनाही अटक होऊन जामीनावर सुटका झाली होती. त्यानंतर या प्रकरणी अधिक तपास करण्यासाठी शिवाजीनगर कोर्टाने नीलम गोर्‍हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या आवाजाचे नमुने घ्यायला पोलिसांना परवानगी दिली. याच प्रकरणात पुणे पोलिसांनी हा अर्ज केला होता.

close