सरकारी कारभारामुळे औरंगाबादकर रेशनकार्डापासून वंचित

November 6, 2008 12:55 PM0 commentsViews: 2

6 नोव्हेंबर, औरंगाबादमाधव सावरगावेऔरंगाबादच्या अन्न धान्य वितरण विभागामध्ये गेल्या दोन वर्षांपासून रेशनकार्ड मागणीचे 63 हजार अर्ज पडून आहेत. प्रलंबित अर्जाची छानणी आणि पाहणी करण्यासाठी पुरवठा विभागाचे कर्मचारीच अनास्था दाखवत आहेत. त्यामुळे सामान्यांना कलेक्टर ऑफिसचे हेलपाटे मारावे लागत आहेत. औरंगाबाद शहरातल्या 63 हजार कुटुंबांनी रेशनकार्डची मागणी केलीय. गेल्या दोन वर्षांपासून कलेक्टर ऑफिसमध्ये रेशनकार्ड मागणीचे अर्ज पडून आहेत. अनेकांना तर अधिकारीच कुठं जायचं तिकडं जा..असं बेफिकीर उत्तर देत असल्याचं आढळुन येतं. आता सर्वे करण्यासाठी पुरवठा विभागाला मुहूर्त मिळालेला नाही. आता हे काम खाजगी संस्थेला देण्याचं पुरवठा विभागानं ठरवलंय.अन्नधान्य वितरण विभागामध्ये रेशनकार्डच्या मागणीचे 63 हजार अर्ज पडून आहेत. दोन वर्षांपासून हे कार्ड पडून का राहिले, याचं खरं उत्तर अधिकार्‍यांना सांगता येत नाही. ' माझ्याकडे त्याचं उत्तर नाही. त्यासाठी साहेबांना भेटावं लागेल ', असं वितरण विभागाच्या कर्मचारी कमल मनोरे यांनी सांगितलं. कार्यालयात कधी अधिकारी जागेवर नसतात, तर कधी कर्मचारी कमी असल्याचं सांगितलं जातं. प्रशासनाच्या या बेपर्वाईनं औरंगाबादमधल्या 63 हजार कुटुंबियांना मात्र हैराण केलंय

close