महाशिवरात्रीनिमित्त वर्ध्यातील हेमाडपंथी मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

March 2, 2011 11:25 AM0 commentsViews: 14

02 मार्च

महाशिवरात्रीनिमित्त सध्या वर्ध्यातील पुरातन हेमाडपंथी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. नवसाला पावणारा महादेव म्हणून या मंदिराची ख्याती आहे. त्यामुळे इथं भाविकांची मोठी गर्दी होत आहे. वर्ध्यातील महादेवपुर्‍यात अडीचशे वर्षांपूर्वीचं हे हेमाडपंथी मंदिर डौलात उभं आहे. 1820 मध्ये तत्कालिन जिल्हाधिकारी विनायक बेदरकर यांच्या पत्नी पार्वती बेदरकर यांच्या पुढाकाराने हे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरात विराजमान असलेली पाषाणची पिंड ही इथल्या खोदकामात मिळाली असून स्वयंभू आहे. अडीचशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या मंदिराची निर्मिती चिरीव दगडापासून केली. तसेच मंदिराचा गाभारा आणि कळसाचं काम कोरीव आहे.

close