चंद्रपूरमध्ये बिबट्याच्या हल्यात कर्मचारी जखमी

March 2, 2011 11:29 AM0 commentsViews: 9

02 मार्च

चंद्रपूरमध्ये जिल्हातील पारडी गावात काल मंगळवारी अचानक बिबट्या शिरल्यानं एकच खळबळ उडाली होती. गावाला लागून असलेल्या जंगलातून भटकून हा बिबट्या गावात शिरला. ही माहिती मिळताच बघ्यांनी बिबट्याला बघण्यासाठी एकच गर्दी केली. बघ्यांच्या गर्दीमुळे बिबट्या घाबरला आणि त्याने रानडूकरावर हल्ला केला. घाबरलेल्या बिबट्याने गावातील बिट गार्डवरही हल्ला केला. या हल्यात बिट गार्ड जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहेत. जवळपास 4 ते 5 तासानंतर वन कर्मचारी या बिबट्याला पकडण्यासाठी दाखल झाले खरे मात्र बिबट्या त्यांच्या हाती लागला नाही .

close