गोंदियात मुलीवर सामुहिक बलात्कार करून खून

March 2, 2011 11:59 AM0 commentsViews: 1

02 मार्च

गोंदिया जिल्ह्यातल्या तिगावमध्ये एका 13 वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचं उघड झालं आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सुनीता तुलसीदास नागोसे या चिमुकलीचा खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणात हेमराज ठाकरे आणि त्याच्या 3 साथीदारांना अटक केली. दरम्यान गावकर्‍यांनी सुनीताचं पोस्टमॉर्टेम एका महिला डॉक्टरकडून करण्यात यावा या मागणी करता आमगावच्या आंबेडकर चौक येथे रस्ता रोको केला आणि जाळपोळ ही केली . त्यानंतर पोलिसांनी सुनीताची बॉडी पुन्हा पोस्टमॉर्टेम करण्याकरता गोंदियाच्या शासकीय रुग्णालयात पाठविली आहे.

close