ठाण्यातील पुलाखालच्या जागेचा सुशोभिकरणचा निर्णय

March 2, 2011 11:36 AM0 commentsViews: 2

02 मार्च

ठाणे जिल्ह्याचे उभारण्यात आलेल्या पुलाखालची जागा पार्किंगसाठी भाड्याने देण्यात आली आहे. ही सर्व जागा पार्किंग रद्द करून पुलाखालची जागा सुशोभिकरण करण्यात यावे असा प्रस्ताव ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयाच्या बैठकीत मांडला आहे. एमएमआरडीए, एमएसआरडीसी, पीडब्लुडी या विभागाचे अधिकारी आणि ठाणे जिल्ह्याचे आमदार, महापौर तसेच सर्व महानगरपालिकांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. येत्या 15 मार्चपासून या कामाला सुरूवात करण्यात येईल आणि पावसाळ्यापूर्वी या पुलाखालची जागा सुशोभिकरण करण्यात येईल. पुलाखालील जागेमध्ये केमिकल टँकरचे पार्किंग केली जाते. यामुळे या पुलांना धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी हा निर्णय घेण्यात आलं असल्याच गणेश नाईक यांनी सागितले.

close