पोलिसांच्या जाचाला कटाळून शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

March 2, 2011 11:45 AM0 commentsViews: 1

02 मार्च

मुलाच्या खून प्रकरणात सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या टोलवा-टोलवीला कटाळलेल्या एका शेतकर्‍याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. सेालापूर जिल्हयातील दारफळाच्या वसंत साठे याचा मुलगा विष्णू याची दोन वर्षापूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास अजुनही लागलेला नाही. विष्णूच्या हत्येच्या पूर्वी त्याला घरातून बोलून नेनार्‍यावर वसंत साठे यांना संशय आहे. विष्णूचे अपहरण झाल्यावर वसंत साठे यांनी सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात हरवल्याचा गुन्हा दाखल केला होता तर विष्णूचा मृतदेह माहोळ पोलिसांच्या हद्दीत सीना नदीत सापडला होता त्यामुळे विष्णूची हत्या कोणी- कोठे केली याचा तपास करण्यावरुन सोलापूर शहर व ग्रामिण पोलिसांनी हात वर केले आहेत. त्यांच्याकडून होणार्‍या टोलवा टोलवी ला कंटाऴून वसंत साठे यांनी हे आत्मदहनाचं पाऊल उचललं.

close