मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेनेला फटका बसण्याची चर्चा

March 2, 2011 1:44 PM0 commentsViews: 8

02 मार्च

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली. सगळ्याचं पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली. त्यात आयुक्त सुबोधकुमार यांनी नगरसेवकांना मिळणार्‍या एक कोटीच्या विकासनिधीला कात्री लावल्याने नगरसेवकांच्या पोटात धस्स झालं. त्याचा फटका सत्ताधार्‍यांना बसणार अशी चर्चा आता सुरू झाली.

पुढच्या वर्षी मुंबई महानगरपालिकेचं बजेट जाहीर होईल तोपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या असतील.त्यामुळे निवडणुकीपूर्वी आपापल्या वॉर्डात छाप पडावी म्हणून सर्वच नगरसेवकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली. पण त्यातच नगरसेवकांना मिळणारा 1 कोटी रुपये विकासनिधी रद्द केला आणि नगरसेवक निधी 60 लाखांपर्यंत वाढवला. पण याला जबाबदार सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक असल्याचा आरोप आता विरोधक करत आहे.

आयुक्तांच्या या निर्णयावर आता सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक थेट नाराजी व्यक्त करत आहे. एकंदरीतच महापालिकेची निवडणूक दहा महिन्यांवर आली असताना नगरसेवकांच्या विकासनिधीला चाप म्हणजे शिवसेनेच्या वॉर्डांमधील विकासकामांना ब्रेक लागण्याची शक्यता त्यामुळेच या निर्णयाचा फटका विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बसणार असला तरी सर्वाधिक फटका हा सत्ताधारी शिवसेनेलाच बसेल अशी चर्चा आता सुरू झाली.

close