सांगलीत वाळूमाफियांचा तहसीलदारावर हल्ला

March 2, 2011 2:37 PM0 commentsViews: 6

02 मार्च

सांगलीजवळ खांजोडवाडी माननदी पात्रातील अवैध वाळू उपसा करणार्‍या कारवाईसाठी गेले असतांना तहसीलदारांवर हल्ला झाला. राम हरी भोसले अस या तहसीलदाराच नाव आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. काल रात्री गस्त घालण्यासाठी गेले असताना भोसले यांच्या सुमो गाडीवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यात ते बचावले. दरम्यान आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. जिवे मारण्याचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न तसेच अवैध वाळू उपसा करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

close