कोल्हापूरच्या विमानतळ धावपट्टीला ग्रीन सिंग्नल मिळण्याची शक्यता

March 2, 2011 2:46 PM0 commentsViews: 4

02 मार्च

कोल्हापूर विमानतळ खराब धावपट्टीमुळे गेल्या जुलै महिन्यापासुन बंद आहे.अता या धावपट्टीचं काम पूर्ण झालं असून आज भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाचे पथकांनी धावपट्टीची पाहाणी के ली आणि त्यांनी धावपट्टीबाबत समाधान व्यक्त केलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसापासून विमानसेवा पुन्हा सुरु होण्याच्या मार्गावर आहे.

पावसाळ्यात धावपट्टी पूर्णपणे उखडली होती. तेव्हापासून कोल्हापूर मुंबई आणि मुंबई कोल्हापूर ही विमानसेवा बंद ठेवण्यातआली होती. त्यामुळे प्रवाशामधुन नाराजी व्यक्त होत होती. पण आज धावपट्टीची पाहाणी करण्यासाठी भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाचे 10 प्रतिनिधीचे पथक कोल्हापूर विमानतळावर आले. हे पथक विमान तळाची पूर्ण पाहाणी करुन याबाबतचा रिपोर्ट भारतीय विमान प्राधिकरणाकडे सोपविणार आहे.आणि त्यानंतर काही दिवसात विमासेवेला सुरवात होण्याची शक्यता आहे.

close