शिवरायांचा मेणाचा पुतळा !

March 2, 2011 2:53 PM0 commentsViews: 5

02 मार्च

प्रसिद्ध शिल्पकार सुनील कंदलूर यांनी तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज मुंबईत करण्यात आलं. हा मेणाचा पुतळा आता लोणावळ्याच्या सेलिब्रिटी वॅट म्युझियम मध्ये ठेवण्यात येणार आहे. लंडनस्थित मॅडम तुसा वॅट म्युझियमच्या धर्तीवर लोणावळ्याला सेलिब्रिटी वॅट म्युझियम स्थापन करण्यात आली आहे. लोणावळ्याच्या या म्युझियम मध्ये महात्मा गांधीजी, पंडित नेहरू, राजीव गांधी, मदर टेरेसा यांच्यासह 26 व्यक्तींचे मेणाचे पुतळे आहेत.

close