राष्ट्रवादीचे मुंबई जिल्हा संघटनेत बदलाचे संकेत

March 2, 2011 5:15 PM0 commentsViews: 2

02 मार्च

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका ध्यानात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई जिल्हा संघटनेत महत्वाचे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई राष्ट्रवादीशी संबंधित पदाधिकार्‍यांची आणि नेत्यांची एक बैठक घेतली. मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत शरद पवार यांनी मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष नरेंद्र वर्मा यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसंच जिल्हा संघटनेतल्या पदाधिकार्‍यांच्या नेमणुका करण्याचे अधिकार वर्मा यांच्याकडून काढून घेण्यात आले. यापुढे पक्षाच्या मुंबईतील आठही आमदार आणि एका खासदाराला पक्षसंघटनेत लक्ष घालण्याची तंबी पवारांनी दिली. या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने मराठी चेहरा आणण्याचा पक्षाचा मानस आहे, असं संकेत पक्षश्रेष्ठींनी यावेळी दिले.

close