आयर्लंडने उडवला इंग्लडचा धुव्वा

March 2, 2011 5:46 PM0 commentsViews: 2

02 मार्च

यंदाच्या वर्ल्ड कपमधल्या पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. केविन ओब्रायनच्या आक्रमक सेंच्युरीच्या जोरावर आयर्लंडनं बलाढ्य इंग्लंडचा 3 विकेट राखून पराभव केला आहे. इंग्लंडने विजयासाठी आयर्लंडसमोर 327 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. याला उत्तर देताना आयर्लंडची सुरुवात खराब झाली. पहिले पाच बॅट्समन अवघ्या 111 रन्समध्ये पॅव्हेलिअनमध्ये परतले. इंग्लंड ही मॅच जिंकणार असं वाटत असतानाच केविन ओब्रायन नावाचं वादळ मैदानावर थडकलं आणि मॅचचं चित्रच पालटलं. ओब्रायननं इंग्लंडच्या बॉलर्सची धुलाई करत अवघ्या 50 बॉलमध्ये सेंच्युरी झळकावली. त्याला तळाच्या बॅट्समननी चांगली साथ दिली.

ऍलेक्स कुसॅकनं 47 रन्स केले. तर 33 रन्स करणार्‍या जॉन म्युनीनं अँडरसनच्या बॉलवर फोर मारत आयर्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. आयर्लंडचा पुढचा मुकाबला येत्या रविवारी भारताशी बंगळुरुच्या याच चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे.

close