लिबियात लष्करशहा गद्दाफी यांचा पायउतार होण्यास नकार

March 2, 2011 6:06 PM0 commentsViews: 1

02 मार्च

लिबियामधला संघर्ष आता चांगलाच चिघळला. आडमुठे लष्करशहा गद्दाफी यांनी आज पुन्हा एकदा पायउतार होण्यास इन्कार केला. गद्दाफींच्या सैन्यानं वायव्येकडची घारयान आणि साब्रथा ही महत्त्वाची शहरं पुन्हा एकदा काबीज केली. गेल्या काही दिवसांपासून या शहरांचा ताबा विरोधकांकडे आणि निदर्शकांकडे होता. गेल्या दोन आठवड्यात सुमारे 6 हजार लोकांचा जीव या संघर्षात गेला. दरम्यान राजधानी ट्रिपोलीमध्ये आज काही वेळापूर्वीच चार स्फोट झाले. गद्दाफींनी पायउतार होण्यास नकार दिल्याने देशभर पुन्हा हिंसक निदर्शनं उसळी. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने बळाचा वापर करायला विरोध केला असला. तरी अमेरिकेच्या युद्धनौका लिबियाच्या जवळ पोचल्या आहेत.

close