सतीश शेट्टी हत्या प्रकरणातील आरोपी दाभाडेला जामीन

March 3, 2011 10:28 AM0 commentsViews: 3

03 मार्च

पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी विजय दाभाडेला जामीन मंजूर झाला. पुणे सेशन्स कोर्टाने दाभाडेला जामीन दिला आहे. गेल्या वर्षी शेट्टी यांची हत्या करण्यात आली होती. शेट्टी यांनी पुणे जिल्ह्यातील भूखंड घोटाळ्याची अनेक प्रकरणं उघडकीस आणली होती. त्यामुळे सतीश शेट्टी यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप विजय दाभाडेवर होता.

close