पत्रकारांवर हल्ला करणारे गुन्हेगार राजकीय वरदहस्तामुळे मोकाट

March 3, 2011 11:27 AM0 commentsViews: 2

03 मार्च

अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील नागलवाडी इथं मागच्या आठवड्यात वाळू माफियांचे चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या मीडियांच्या प्रतिनिधींवर प्राणघातक हल्ला करून त्यांचे कॅमेरे आणि वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी कर्जत पोलिसांनी प्रदीप बबन सुर्वेकर आणि जालिंदर मोहरकर या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीही ठोठावण्यात आली. मात्र या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सतिश शिंदे आणि पोपट शिंदे हे राजकीय वरदहस्तामुळे अजूनही फरार आहेत. या दोघांना मामा बीड सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिलीप हंबर्डे यांचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे.

close