अॅपल आयपॅड – 2 लाँच

March 3, 2011 12:07 PM0 commentsViews: 7

03 मार्च

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असलेला आयपॅड 2 सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये लाँच करण्यात आला आहे. ऍपलचे सीईओ स्टिव्ह जॉब्स यांनी नवीन आयपॅड 2 जगाला दाखवला. पहिल्या आयपॅडपेक्षा हा नवा आयपॅड फास्ट वजनाला हलका आणि कमी जाडीचा असेल. व्हिडिओ कॉलिंगसाठी या आयपॅडला फ्रंड फेसिंग कॅमेरा तर फोटोज आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी हाय डेफिनेशन कॅमेरा मागच्या बाजूला असेल. ऍपलच्या ऑपरेटिंग सिस्टीमची नवीन व्हर्जन या आयपॅड 2 मध्ये असेल. 11 मार्चपासून या आयपॅडची अमेरिकेत विक्री सुरु होईल. यातल्या 16 जीबी वायफाय मॉडेलची किंमत असेल 499 डॉलर, 32 जीबीची 599 डॉलर तर 64 जीबीच्या मॉडेलची किंमत असेल 699 डॉलर, वायफाय आणि थ्रीजी अशी दोन्ही कनेक्टिव्हिटी असणार्‍या मॉडेलची किंमत असेल 16 जीबी 629 डॉलर, 32 जीबी 729 डॉलर, 64 जीबीची किंमत असेल 829 डॉलर.

close