कृपाशंकर सिंग यांच्या मालमत्ता प्रकरणी सुनावणी तहकूब

March 3, 2011 1:09 PM0 commentsViews: 3

03 मार्च

मुंबई काँग्रेसचे कृपाशंकर सिंग यांच्या बेहीशेबी मालमत्ता प्रकरणी इन्कम टॅक्स विभाग, अंमलबजावणी संचालनालय आणि अँटी करप्शन ब्युरो यांनी एकमेकांची माहिती एकत्र करून सुसंगत तपास करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालय आणि अँटी करप्शन ब्युरो यांना आज चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते. परंतु त्यांनी पुन्हा वेळ मागून घेतली. त्यामुळे हायकोर्टानं या प्रकरणाची सुनावणी 4 आठवड्यांपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

close