नेदरलँडवर दक्षिण आफ्रिकेचा सहज विजय

March 3, 2011 1:14 PM0 commentsViews: 1

03 मार्च

वर्ल्ड कपमधल्या आजच्या पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकाने अपेक्षेप्रमाणेच नेदरलंडविरुद्ध विजय मिळवला. आणि तोही 251 रननी. मॅचवर पूर्णपणे आफ्रिकन टीमचं वर्चस्व होतं. आधी पहिली बॅटिंग करत आफ्रिकेने 351 रनचा विशाल स्कोअर उभारला. एबी डिव्हिलिअर्सने 134 तर अमलाने 113 रन केले. त्यानंतर नेदरलँडची पूर्ण इनिंग त्यांनी 120 रनमध्ये गुंडाळली. नेदरलँडतर्फे एकट्या बरेसीने 44 रन केले. आफ्रिकन टीमतर्फे इमरान ताहीरने तीन विकेट घेतल्या.

close