पोलिसांना दमबाजी करणार्‍या वाळू तस्करांना पोलीस कोठडी

March 3, 2011 1:04 PM0 commentsViews: 1

03 मार्च

पुणे जिल्ह्यातल्या वाळू तस्करांची मुजोरी संपेनाशी झाली आहे. वडज इथं बेकायदा वाळू उपसा करून पळून जाणार्‍या आणि पकडल्यानंतर पोलिसांनाच दमबाजी करणार्‍या दोन वाळू माफियांना जुन्नर पोलिसांनी मंगळवारी रात्री गजाआड करून 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली. नितीन विधाटे आणि वैभव किसन खैरे अशी या आरोपींची नावं आहेत. मात्र पोलिसांनी हटकल्यानंतर त्यांनी टेम्पोचालक सचिन शिंदे याला पळून जाण्यासाठी पोलिसांना बोलण्यात गुंतवलं. आता पोलीस टेम्पोचालक सचिन शिंदेचा शोध घेत आहेत.

close