मालेगावमध्ये पुरणपोळयांच गावजेवण !

March 3, 2011 12:00 PM0 commentsViews: 3

03 मार्च

मालेगावमधल्या मुंगसे गावात पुरणपोळ्यांच आगळवेगळ गावजेवण घालण्यात आलं. महाशिवरात्रीचा उपवास गावातल्या शिवमंदिरासमोर एकत्रपणे अनोख्या पद्धतीनं सोडण्याची या गावची प्रथा आहे. महाशिवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी या गावात घरोघरी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करण्यात येतो. नंतर या पोळ्या गावात एकत्र एकाच मांडवात आणून गावजेवण करण्यात आलं. विशेष म्हणजे हा उपवास सोडण्यासाठी गावातल्या महिलांना आणि लहान मुलांना प्राधान्य दिलं जातं. नंतर पुरुष उपवास सोडतात.

close