..तर कातिर्की एकादशी पूजेला जाणार नाही – उपमुख्यमंत्री

November 6, 2008 2:30 PM0 commentsViews: 6

6 नोव्हेंबर, पुणेडाऊ कंपनीविरुद्ध वारकर्‍यांचं आंदोलन आता कातिर्की एकादशीच्यानिमित्तानं पुन्हा पेटलंय. डाऊ सरकार प्रकरणी वारकर्‍यांबरोबरआहे. पण असं सांगूनही जर वारकरी शांत होणार नसतील, तर मी कार्तिकी एकादशीच्या पूजेला जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनी दिला आहे. कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या पूजेला बंडातात्यांनी विरोध करू नये, ती जनतेची पूजा आहे, असा निर्णय दिंडी संघटना, वारकरी समुदाय आणि संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या सदस्यांनी घेतलाय. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात वारकर्‍यांची गर्दी वाढली असून दर्शन रांगेत सध्या 40 हजार भाविक उभे आहेत.

close