मुंबईत पाणी हक्क परिषदेच निदर्शन

March 3, 2011 5:18 PM0 commentsViews: 5

03 मार्च

मुंबईतल्या विविध भागात पाणी हक्क परिषदे मार्फत आज निदर्शनं करण्यात आली. अमेरिकन पाणी व्यापार मिशन यांच्याशी सरकार आणि मुंबई महानगरपालिकेची चर्चा सुरू आहे. या चर्चेच्या विरोधात ही निदर्शने करण्यात आली. यामध्ये समुद्राचं पाणी गोडं करण्याचा प्रकल्प आणि रिसायकलींगचा प्रकल्प यासारख्या अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प या कंपन्याच्या घशात घालण्याचा घाट घातलेला आहे असा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे सामान्य मुंबईकराला आज ज्या भावात पाणी मिळते त्यापेक्षा अधिक दर मोजावा लागेल. त्यामुळे मुबंई महापालिका पाणी पुरवठ्याच्या बाबतीत अग्रेसर यंत्रणा असताना तिला कमजोर करून अमेरिकन कंपन्यांचे नियंत्रण प्रस्थापित करण्याचा होणार्‍या प्रयत्नाच्या विरोधात मुंबईतल्या विविध कार्यकर्यांनी पाणी हक्क परिषदेच्या बॅनर खाली हे आंदोलन केले.

close