भाजपचा आता पंतप्रधानांकडे मोर्चा

March 3, 2011 5:43 PM0 commentsViews: 4

03 मार्च

थॉमस यांची नेमणूक रद्द होणं हा आमचा विजय आहे असं भाजपने म्हटलं आहे. पण मुळात थॉमस यांची मुख्य दक्षता आयुक्तपदी नेमणूक झालीच कशी हे विरोधकांना जाणून घ्यायच आहे. सुप्रीम कोर्टाने दोन वेळा कडक ताशेरे ओढल्यानंतरही केंद्राने थॉमस यांच्याकडून राजीनामा घेतला नव्हता. या सर्व गोष्टींची उत्तरं देताना केंद्र सरकारला पंतप्रधान डॉ सिंग यांचाही बचाव करावा लागणार आहे.

"मी सहमत नाहीये".. हे शब्द आहेत सुषमा स्वराज यांचे. पीजे थॉमस यांची नेमणूक होताना त्यांनी आपला विरोध लेखी स्वरूपात दिला होता. आणि सहा महिन्यांच्या आत.. त्यांचं म्हणणं सुप्रीम कोर्टानं उचलून धरत. केंद्र सरकारला जबर झटका दिला. म्हणून 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात जेपीसीची स्थापना झाल्यानंतर विजयी मुद्रेत असलेल्या भाजपने आता पुन्हा एकदा आपला मोर्चा पंतप्रधानांकडे वळवला आहे. आणि त्यांनी उत्तर द्यावं अशी मागणी केली.

थॉमस यांच्या निवडीला हे तिघं जबाबदार आहेत. सुषमा स्वराज यांनी या निवडीला आपला विरोध व्यक्त केला होता. त्यामुळे आता उरलेल्या दोघा जणांना झाल्या प्रकाराचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. विरोधकांचा पवित्रा पाहता. आता पंतप्रधानांना वाचवण्याचे प्रयत्न यूपीएला करावे लागत आहे.

close