नव्या आयुक्तांसाठी सोनिया गांधींच्या घरी बैठक

March 3, 2011 5:49 PM0 commentsViews: 2

03 मार्च

थॉमस प्रकरणी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर आज संध्याकाळी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पक्षाध्यक्ष सोनिया गांधींच्या निवासस्थानी पार पडली. त्यात नव्या केंद्रीय दक्षता आयोगाच्या आयुक्तपदी कुणाची नेमणूक करायची यावर चर्चा झाली. सुप्रीम कोर्टाच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान थॉमस यांच्या नियुक्तीचा निर्णय हा त्यावेळी नेमलेल्या कमिटीने घेतला होता. आपण त्या कमिटीचे सदस्य नव्हतो, सुप्रीम कोटाच्या निर्णयावर आणि केंद्र सरकारवर भाष्य करेल असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं. थॉमस यांची नेमणूक झाली तेव्हा चव्हाण यांच्याकडे डीओपीटी म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंगची जबाबदारी होती.

close