बाबरी मशीद प्रकरणी अडवाणी, ठाकरेंसह 21 जणांना नोटीस

March 4, 2011 8:51 AM0 commentsViews: 9

04 मार्च

बाबरी मशीद प्रकरणी 21 जणांना सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली आहे. या 21 नेत्यांमध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांना ही नोटीस बजावण्यात आली. कट रचल्याच्या गुन्ह्यासंदर्भात खटला चालवण्या संदर्भातील ही सुनावणी होती. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडल्यानंतर दोन एफआयआर नोंदवण्यात आले होते. पहिला गुन्हा अज्ञात लोकांविरोधात नोंदवण्यात आला होता. तर दुसरा एफआयआर 21 राजकीय नेत्यांविरोधात नोंदवण्यात आला होता. दुसरी एफआयआर स्थानिक कोर्ट आणि अलाहाबाद कोर्टानं रद्द केली होती. अलाहाबाद कोर्टाविरोधात सीबीआय सुप्रीम कोर्टात गेली. आणि या राजकीय नेत्यांची चौकशी करण्याची विनंती केली होती. सुप्रीम कोर्टानं याचिका दाखल करुन घेतली आणि त्यासंदर्भातील पहिली सुनावणी आज झाली.

close