हसन अली याला कारणे दाखवा नोटीस

March 4, 2011 8:57 AM0 commentsViews: 2

04 मार्च

काळ्या पैशांच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं काल गुरूवारी केंद्र सरकारला फटकारल्यानंतर आता पुण्याचा घोडे व्यापारी हसन अलीला इन्कम टॅक्स ट्रिब्युनलनं कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. आतापर्यंत हसन अलीविरूद्ध कारवाई का गेली नाही असा सवालही ट्रिब्युनलनं विचारला. नोटीशीचं उत्तर देण्यासाठी हसन अलीला 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 18 मार्चपर्यंत हसन अलीला उत्तर द्यावं लागणार आहे.

परदेशात काळा पैसा असणार्‍यांमध्ये हसन अलीचंही नाव आहे त्यानं 8 हजार अब्ज डॉलर्सची संपत्ती विदेशी बँकेत ठेवल्याचं बोललं जातंय. तसेच 50 हजार कोटी कर चुकवल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. काळ्या पैशांसदर्भात हसन अली व अन्य आरोपींना अजून अटक का केली नाही असा सवाल सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला विचारला होता. हसन अलीसह अन्यआरोपींवर कारवाई करण्यात कुचराई केल्यास या तपासावर लक्ष ठेवण्यासाठी एका विशेष अधिकार्‍याची नेमणूक करावी लागेल असा इशाराही सुप्रीम कोर्टानं दिला.

close