कॉमनवेल्थ घोटाळ्या प्रकरणी लालींविरुद्ध एफआयआर दाखल

March 4, 2011 9:02 AM0 commentsViews: 2

04 मार्चकॉमनवेल्थ गेम्सच्या प्रसारण हक्क घोटाळा प्रकरणी प्रसार भारतीचे निलंबित सीईओ बी. एस. लाली यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक आणि भ्रष्टाचाराचे लालींवर आरोप आहेत. तसेच वसिम देहल्वी यांच्या दिल्लीतल्या घरावरही सीबीआयनं छापे टाक ले आहेत. वसिम देहल्वी हे झुम कंपनीचे मालक आहेत. झुम ही टेलिव्हीजन इक्वीप्मेट पुरवणारी कंपनी आहे. झुम ने कॉमनवेल्थ खेळांच्या आयोजनात काही इक्वीपमेंट पुरवली होती.

close