सोलापूर महापालिकेत आघाडीत बिघाडी

March 4, 2011 9:41 AM0 commentsViews: 2

04 मार्च

सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत बिघाडी झाली आहे. गेली 4 वर्षे सत्तेत असलेल्या दोन्ही काँग्रेसनं एकमेकांवर आघाडीचा धर्म न पाळल्याचे आरोप-प्रत्यारोप केले आहेत. स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीवरून या दोघांमध्ये वाद निर्माण झाले आणि दोघांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. महापालिकेवर सत्ता स्थापन करतेवेळी चौथ्या वर्षी राष्ट्रवादीला स्थायी सभापतीपद द्यायचा करार काँग्रेसनं पाळला नाही. पक्षाची ताकद पाहता काँग्रेसला राष्ट्रवादीची गरजही भासत नाही. त्यामुळेच काँग्रेसनं हा निर्णय घेतला आणि आघाडीत बिघाडी झाली.

close