राजकीय पक्षांना वेध ‘देशद्रोही’ पाहण्याचे

November 6, 2008 2:41 PM0 commentsViews: 7

6 ऑक्टोबर, नवी दिल्ली – सुशांत मेहता बॉलिवुडचा 'एसआरके' महिमा वेगळा सांगायला नको, पण आता लवकरच 'केआरके'चा महिमाही पहायला मिळणार असं दिसत आहे. 'केआरके' म्हणजे कमाल रशिद खान. 'देशद्रोही' या सिनेमाचा निर्माता आणि अभिनेता. नुकतंच मुंबईत झालेल्या राहुल राज या बिहारी तरुणाच्या एनकाऊंटरशी हा सिनेमा साधर्म्य पावत असल्याचा दावा कमाल यांनी केला आहे. सध्या टीव्हीवर तुम्हाला 'देशद्रोही' या सिनेमाचे प्रोमोज वरचेवर पहायला मिळत असतील. कारण हा सिनेमा आता रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सिनेमाचा निर्माता, लेखक आणि अभिनेता आहे कमाल रशिद खान ज्यानं प्रोमोमध्ये स्वतःचा उल्लेख 'केआरके'म्हणून केला आहे. मग सिनेमाचं काय? तर हा सिनेमा मराठी अमराठीच्या सध्याच्या चर्चित मुदद्यांवर आधारला असल्याचा कमाल यांचा दावा आहे. 'देशद्रोही'च्या प्रोमोजमुळं 'मनसे'आणि 'शिवसेने'नं रिलीज आधी सिनेमा पहाण्याचा आग्रह धरला आहे. शिवाय मुंबई पोलिसांनीही रिलीजआधी सिनेमाचा वेगळा शो दाखवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या सिनेमाचा निर्माता मात्र गोंधळात पडला आहे.

close