मोरूची मावशी पुन्हा रंगभूमीवर

March 4, 2011 10:38 AM0 commentsViews: 125

04 मार्च

मोरूची मावशी हे आचार्य अत्र्यांचं गाजलेलं नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे.आर डी सामंत आणि निलम शिर्के यांच्या अस्मी आणि किर्ती प्रॉडकश्नतर्फे मोरूची मावशी नव्या ढंगात येत्या 5 तारखेला रंगभूमीवर येतं आहे. विजय चव्हाण यांनी याआधी रंगवलेली लाजवाब मावशीची भूमिका यावेळी साकारत आहे अभिनेते सतीश तारे.

विजय चव्हाण यांनी रंगवलेल्या या मावशीला अख्ख्या महाराष्ट्राने याआधी डोक्यावर घेतलं होतं. आत्ता हेच टांग टिंगा गाणं घेऊन अभिनेते सतीश तारे सज्ज झाले आहे. नवीन मोरूची मावशी साकारायला. मावशीचा तोच नखरेलपणा, साजशृंगार करण्यात तारे सध्या खूप मेहनत घेत आहे.

1985 ला सुयोग नाट्यसंस्थेने हे नाटक रंगमंचावर आणलं होतं. त्यात या मावशीच्या जोडीला होते प्रशांत दामले आणि प्रदीप पटवर्धन. तर आत्ताच्या मोरूच्या मावशीला साथीला आहे प्रियदर्शन जाधव आणि अमोल बावडेकर. महत्वाचं म्हणजे या नवीन ढंगातील मोरूच्या मावशीचं दिग्दर्शनही प्रियदर्शनचं करत आहे.

या सगळ्या तरूण कलाकारांबरोबरच ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटेसुध्दा या नाटकात प्रमुख भूमिका करतायत मोरूची मावशी या नाटकाचे मोजकेच 25 प्रयोग होणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर या फर्मास मावशीने गायलेल्या 'टांग टिंग टिंगा' या गाण्याचे बोल आपल्याला ऐकायला मिळणार आहेत.

close