न्युझीलंडचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय

March 4, 2011 12:42 PM0 commentsViews: 2

04 मार्च

वर्ल्ड कपमधील आजची पहिली मॅचही कमी रन्सची आणि एकतर्फी झाली. न्यूझीलंडने दुबळ्या झिम्बाब्वेचा 10 विकेट राखून धुव्वा उडवला. न्यूझीलंडचा या स्पर्धेतला दुसरा विजय तर झिम्बाब्वेचा दुसरा पराभव ठरला आहे. झिम्बाब्वेनं विजयासाठी न्यूझीलंडसमोर 163 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. ब्रॅडम टेलरनं एकाकी झुंज देत 44 रन्स केले. पण इतर बॅट्समननं न्यूझीलंडच्या बॉलर्ससमोर सपशेल शरणागती पत्कारली. न्यूझीलंडतर्फे टीम साऊदीनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. न्यूझीलंडने हे लक्ष्य 33 ओव्हरमध्येच एकही विकेट न गमावता पार केलं. मार्टिन गुप्टीलनं नॉटआऊट 86 तर ब्रॅडम मॅक्युलमनं 76 रन्स केले.

close